विष्णूराजे पाटील-कुरुंदकर

नमस्कार,
माझ्या ब्लॉगवर मी आपले मनापासून स्वागत करतो. दिवसाढवळ्या स्वप्न पाहणारा, कल्पनेच्या जगात शब्दांना बांधणारा, कधीच स्वस्थ न बसणारा, धडपडणारा, फडफडणारा, कुणाच्याही बापालाही न घाबरणारा मी 'श्रीविष्णुराजे पाटील-कुरुंदकर'. मला नेहमी वाटतं मी शिवरायासारखं जगावं शिवरायांप्रमाणे लढावं आणि शिवरायांप्रमाणे कीर्तीरुपी उरावं.
खूप काही सुचत असतं; बरंच काही लिहावसं ही वाटतं पण वेळेअभावी राहून जात. आता जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा वाटत, ते करायला पाहिजे होतं! खरंतर मी पुण्याच्या या गर्दीत वावरतो पण मला एकांत आवडतो. मला आजूबाजूला मित्र लागतात, मला त्यांच्याशी खूप काही बोलावसं वाटतं पण तरीही मी गप्पं बसून राहणे पसंद करतो. मला हसायला खूप आवडतं पण तरीही डोळ्यातून अश्रू काढायला मी निमित्त शोधत असतो.
बऱ्याच गोष्टी ज्या मला वेळोवेळी जाणवतात पण मी त्यांना माझ्या मनाच्या कप्प्यात दडवून ठेवलं आहे. ते माझं मन (माझ्या भावना, माझा संघर्ष, माझं सुख-दु:ख) मी येथे व्यक्त करणार आहे.
मी जे काही जगतो, जे काही अनुभवतो, ज्याची कल्पना करतो. ते मी यामाझ्या ब्लॉगवर लिहिणार आहे. भारतातील घाणेरडे राजकारण, जातीयवाद सोडलं तर इतर बऱ्याच विषयावर मी माझे मत मांडणार आहे तेव्हा तुमच्या टीकाटिपणीचे स्वागतच असेल...
धन्यवाद!!!
आपला श्रीविष्णूराजे पाटील-कुरुंदकर.

बिनधास्तपणे Whatsapp वर माझ्याशी मैत्री करा
+91 9665379668

Friday, December 2, 2011

मराठी चित्रपट

"मराठी चित्रपटाना चांगले दिवस आले आहेत"याचा मला खूप आनंद होत आहे.
मराठी चित्रपट आता स्वताची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. सर्व जग त्याच्याकडे आदराने पाहत आहे. राष्ट्रीय-अंतराष्ट्रीय पुरस्कार मिळत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत एवढा बदल कसा झाला? खर तर या विषयावर बरंच लिहिता येईल. अजय -अतुल म्हणालेत पुढे बघा अजून खूप काही व्हायचे बाकी आहे...या माय मराठीच्या भरभराटीला नवीन दिग्दर्शक, निर्मात्यांचा मोठा वाटा आहे. ४० ते ५० लाख रुपये प्रसिद्धीसाठी खर्च केले जात आहेत. मराठीतील दिग्दर्शकांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीवाले सुद्धा तोंडात बोटे घालायला लागले आहेत.
मराठी प्रेक्षकांना मराठी चित्रपट आवडू लागले आहेत. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना सतत नवीन देत राहण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानी चालू ठेवला पाहिजे आणि मराठी प्रेक्षकांनी सुद्धा कुटुंबासह एकत्र मिळून मराठी चित्रपट पाहायला सिनेमाग्रहात जावे (जावेच) शासन मराठी चित्रपटना अनुदान देत हि खूप चांगली बाब आहे,मला वाटत शासनाने अनुदान वाढवायला पाहिजे.
मराठी चित्रपटांचे हिंदीतही डब्बिंग करावे त्यामुळे चित्रपटांची प्रेक्षकसंख्या वाढेलच आणि मराठी सिनेमा दुसर्या राज्यातही प्रदर्शित होईल त्याचा आर्थिक फायदाही होईल. तसेच पायरेटेड सीडींचा चित्रपटांवर परिणाम होतो पायरेटेड सीडी आल्यानंतर चित्रपटगृहात जास्त लोक जात नाहीत. त्यामुळे पायरसीवर शासनाने कडक कायदा केला पाहिजे, त्याशिवाय काळाबाजार थांबणार नाही. किमान १२-१५ आठवडे चित्रपट चालला तरच निर्मात्याच्या हातात काहीतरी पडत त्यामुळे जागरूक मराठी तरुणांनी हे लक्षात घ्यावे.

No comments:

Post a Comment