विष्णूराजे पाटील-कुरुंदकर

नमस्कार,
माझ्या ब्लॉगवर मी आपले मनापासून स्वागत करतो. दिवसाढवळ्या स्वप्न पाहणारा, कल्पनेच्या जगात शब्दांना बांधणारा, कधीच स्वस्थ न बसणारा, धडपडणारा, फडफडणारा, कुणाच्याही बापालाही न घाबरणारा मी 'श्रीविष्णुराजे पाटील-कुरुंदकर'. मला नेहमी वाटतं मी शिवरायासारखं जगावं शिवरायांप्रमाणे लढावं आणि शिवरायांप्रमाणे कीर्तीरुपी उरावं.
खूप काही सुचत असतं; बरंच काही लिहावसं ही वाटतं पण वेळेअभावी राहून जात. आता जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा वाटत, ते करायला पाहिजे होतं! खरंतर मी पुण्याच्या या गर्दीत वावरतो पण मला एकांत आवडतो. मला आजूबाजूला मित्र लागतात, मला त्यांच्याशी खूप काही बोलावसं वाटतं पण तरीही मी गप्पं बसून राहणे पसंद करतो. मला हसायला खूप आवडतं पण तरीही डोळ्यातून अश्रू काढायला मी निमित्त शोधत असतो.
बऱ्याच गोष्टी ज्या मला वेळोवेळी जाणवतात पण मी त्यांना माझ्या मनाच्या कप्प्यात दडवून ठेवलं आहे. ते माझं मन (माझ्या भावना, माझा संघर्ष, माझं सुख-दु:ख) मी येथे व्यक्त करणार आहे.
मी जे काही जगतो, जे काही अनुभवतो, ज्याची कल्पना करतो. ते मी यामाझ्या ब्लॉगवर लिहिणार आहे. भारतातील घाणेरडे राजकारण, जातीयवाद सोडलं तर इतर बऱ्याच विषयावर मी माझे मत मांडणार आहे तेव्हा तुमच्या टीकाटिपणीचे स्वागतच असेल...
धन्यवाद!!!
आपला श्रीविष्णूराजे पाटील-कुरुंदकर.

बिनधास्तपणे Whatsapp वर माझ्याशी मैत्री करा
+91 9665379668

Friday, December 2, 2011

संसदेचे हिवाळी अधिवेशन

संसदेचे हिवाळी अधिवेशन आता दुसऱ्या आठवड्यात जाऊन पोचले आहे आणि या ९ दिवसात संसदेत कोणत्याही स्वरूपाचे ठोस कामकाज झालेले नाही. त्यास कॉंग्रेस आणि विरोधक दोघेहि कारणीभूत आहेत. या अधिवेशनाकडे संपूर्ण भारतीयांचे लक्ष लागलेले आहे कारण या अधिवेशनात बहुचर्चित लोकपाल विधेयक मंजूर केले जाईल, अशी ग्वाही सरकार पक्षानेच अण्णा हजारे यांना दिली आहे. देशाच्या सामान्य माणसांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जनतेने या नालायकांना संसदेत पाठवले आहे, त्या संसदेचाही हे डुकर अवमान करत आहेत. महागाई, काळा पैसा, भ्रष्टाचार, शेतकर्यांच्या आत्महत्या अशा सामान्यांनाला भेडसावणाऱ्या या प्रश्नांवरून साऱ्याचेच लक्ष उडावे म्हणून सरकार पक्षानेच ही खेळी जाणीवपूर्वक केली असच वाटतंय.  "रिटेल' बाजारातील "होलसेल' गुंतवणूक हा महागाई, काळा पैसा, भ्रष्टाचार यापेक्षा महत्वाचा विषय नाही. हा सगळा गोंधळ लोकपाल विधेयकावरून फ़क्त लक्ष विचलीत करण्यासाठी चाललेला आहे, असच वाटत आहे. जोपर्यंत भ्रष्टाचारावर कडक कायदा पास होत नाही तोपर्यंत मोठे निर्णय लादणे संशयास्पद आहे. लोकपाल विधेयक, गरीबी, महागाई, भ्रष्टाचार इत्यादींवर आगोदर चर्चा व्हायला पाहिजे त्या नंतर "रिटेल' बाजारातील "होलसेल' गुंतवणूक' यावर चर्चा व्हायला पाहिजे. उगाच नसते विषय काढून सर्वांचा वेळ आणि जनतेचा पैसा वाया घालायचा मग थप्पड किंवा चप्पल पडणारच.
या ९ दिवसात किमान २८ कोटी रुपये निष्फळ वाया गेलेले आहेत,हे या भ्रष्ट राजकारण्यांना माहीतच आहे. म्हत्वाच म्हणजे हे भ्रष्ट्र नेते खरच देशहिताचा निर्णय घेउ शकतात यावर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. गेल्या वर्षीचे हिवाळी अधिवेशन फारसे काही न होताच पार पडले होते आणि हे अधिवेशन सुद्धा मागील अधिवेशाना प्रमाणे कोणतेही कामकाज न होता संपविण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कॉंग्रेसला अनेक वेळा संधी देऊन झाले पण भ्रम निरास झाला आहे. या कॉंग्रेस सरकारकडे इमानदार नेते नाहीत हे मात्र नक्की. संसद चालविण्याची अक्कल नसलेल्या कॉंग्रेस कडून अपेक्षा न करता, महागाई अनेक पटीने वाढणार याचीच चिंता आहे. सरकार कडून विकासाला पोषक विधायक कामाची अपेक्षा करणे चुकीचेच आहे. महागाई अनेक पटीने वाढणार  asach vatate. लोकपालवर आंदोलन करणाऱ्या अण्णा आणि त्यांच्या संघाला सरकारने मजबूत लोकपाल विधेयक आपण संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडू, असे आश्वासन दिले होते. बाकी आश्वासनांचे काय व्हायचे ते होवो. पण सरकारला हे आश्वासन पाळावेच लागेल. तसे न झाल्यास आपण पुन्हा उपोषण सुरू करू असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे. हे कॉंग्रेसने लक्षात घ्यावे. अन्यथा आमचे बूट आणि त्याचा गालाच.....

No comments:

Post a Comment