सरकारच्या चांगल्या कृतींचे कौतुक करा आणि त्यांच्या कर्तव्यच्युत भूमिकेवर लेखणीच्या शस्त्राने, कडाडून हल्ला करा कारण सरकार जे चांगले करते ते त्यांचे कर्तव्यच आहे, त्यासाठीच त्याना जनतेने निवडून दिलेले आहे. मात्र जेव्हा ते स्वार्थी राजकारणी भ्रष्टाचाराला समर्थन देण्यासाठी जेव्हा चुकीची धोरणे राबवतात, दहशतवादाला संपवण्यामध्ये कमी पडतात, तेव्हा त्यांची खेटराने पूजाच व्हायला पाहिजे.
जनतेच्या जीवाचे, हिताचे आणि मालमत्तेचे संरक्षण करणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. ते त्यांनी निभावालेच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत. सत्तेशी, स्वार्थाशी तडजोड न करता..जर हे जमत नसेल तर सत्तेवरून पाय उतार होणे ह्याशिवाय त्यांच्या पुढे पर्याय नाही.
आज भारतात हीच परिस्थिती आहे कॉंग्रेस सर्व पातळ्यावर अपयशी ठरले आहे. कॉंग्रेसला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. बंधुनो, कॉंग्रेसला यापुढील निवडणुकीत निवडून देवू नका.