विष्णूराजे पाटील-कुरुंदकर

नमस्कार,
माझ्या ब्लॉगवर मी आपले मनापासून स्वागत करतो. दिवसाढवळ्या स्वप्न पाहणारा, कल्पनेच्या जगात शब्दांना बांधणारा, कधीच स्वस्थ न बसणारा, धडपडणारा, फडफडणारा, कुणाच्याही बापालाही न घाबरणारा मी 'श्रीविष्णुराजे पाटील-कुरुंदकर'. मला नेहमी वाटतं मी शिवरायासारखं जगावं शिवरायांप्रमाणे लढावं आणि शिवरायांप्रमाणे कीर्तीरुपी उरावं.
खूप काही सुचत असतं; बरंच काही लिहावसं ही वाटतं पण वेळेअभावी राहून जात. आता जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा वाटत, ते करायला पाहिजे होतं! खरंतर मी पुण्याच्या या गर्दीत वावरतो पण मला एकांत आवडतो. मला आजूबाजूला मित्र लागतात, मला त्यांच्याशी खूप काही बोलावसं वाटतं पण तरीही मी गप्पं बसून राहणे पसंद करतो. मला हसायला खूप आवडतं पण तरीही डोळ्यातून अश्रू काढायला मी निमित्त शोधत असतो.
बऱ्याच गोष्टी ज्या मला वेळोवेळी जाणवतात पण मी त्यांना माझ्या मनाच्या कप्प्यात दडवून ठेवलं आहे. ते माझं मन (माझ्या भावना, माझा संघर्ष, माझं सुख-दु:ख) मी येथे व्यक्त करणार आहे.
मी जे काही जगतो, जे काही अनुभवतो, ज्याची कल्पना करतो. ते मी यामाझ्या ब्लॉगवर लिहिणार आहे. भारतातील घाणेरडे राजकारण, जातीयवाद सोडलं तर इतर बऱ्याच विषयावर मी माझे मत मांडणार आहे तेव्हा तुमच्या टीकाटिपणीचे स्वागतच असेल...
धन्यवाद!!!
आपला श्रीविष्णूराजे पाटील-कुरुंदकर.

बिनधास्तपणे Whatsapp वर माझ्याशी मैत्री करा
+91 9665379668

Sunday, January 9, 2011

Shreevishnuraje Patil-Kurundkar


'जे अशक्य वाटतय असं अवघड स्वप्न सत्यात आणण्याची माझ्या मनाची ओढ!! आणि ह्या ओढीतूनच फावल्या वेळात जे काय करतो त्याचं छोटंसं टिपण म्हणजे हा माझा ब्लॉग!!!'
Hi,
I am busy in scriptwriting